पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारणसामाजिक

भारतीय संविधान दिन थेरगाव येथे उत्साहात साजरा : रेखाताई नरेंद्र माने

भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा : रेखाताई नरेंद्र माने

रेखा नरेंद्र माने आयोजित रन फॉर संविधान स्पर्धेतील विजेत्यांना आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते बक्षीस वितरण
रन फॉर संविधान कार्यक्रमाला थेरगावमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

हजारो विद्यार्थी आणि नागरिकांनी रन फॉर संविधान मध्ये घेतला सहभाग
भारतीय संविधानामुळेच आपण इथे उभे राहू शकतो __ आमदार, शंकर जगताप

| पुणे मोर्चा न्यूज | थेरगाव, दिनांक २६ :  आज २६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त सौ. रेखाताई नरेंद्र माने यांनी थेरगाव मधील नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी ‘रन फॉर संविधान” कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी विजेत्यांना आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते बक्षीस वितरण संपन्न झाले. यावेळी शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी आणि सामान्य नागरिकांनी हजारोंच्या संख्येमध्ये सहभागी होऊन संविधान दिन साजरा केला. थेरगाव आणि परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. यामध्ये काळुरामशेठ बारणे, ( भाजप नेते ), अभिषेक बारणे (; माजी नगरसेवक ) तानाजी बारणे ( सामाजिक कार्यकर्ते ), सनी बारणे ( भाजप युवा मोर्चा ) रवी भिलारे ( सामाजिक कार्यकर्ते )  बाबासाहेब राठोड ( मुख्याध्यापक पिएमश्री विद्यालय ) , स्वामी विवेकानंद विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल चे विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक स्टाफ, यांच्यासह इतर मान्यवर व सौ. रेखाताई नरेंद्र माने आणि नरेंद्र माने ( अध्यक्ष : संजय गांधी निराधार योजना, चिंचवड विधनासा ) प्रबोधनकार शारदाबाई मुंढे, हभप गणेश फरताळे महाराज यांच्या सह इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
चार गटांमध्ये “रन फॉर संविधान” स्पर्धा झाली. प्रत्येक ग्रुपसाठी प्रथम बक्षीस रोख रक्कम १०,००१/.रू ट्रॉफी आणि संविधानाची प्रत, द्वितीय बक्षीस ६,००१/.रू ट्रॉफी आणि संविधानाची प्रत, तृतीय बक्षीस ३००१/.रू ट्रॉफी आणि संविधानाची प्रत तसेच प्रतीक सहभागी विद्यार्थी विद्यार्थिनीसाठी संविधानाची प्रस्तावना प्रत भेट दिली गेली. चारही गटामध्ये विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे
* विद्यार्थी
१. प्रथम : जय गणेश कपडे
२. द्वितीय : औदुंबर परमेश्वर खराडे
३. तृतीय : कौस्तुभ योगेश भोसले
* विद्यार्थीनी
१. प्रथम : अनुष्का अनिल कुंभार
२. द्वितीय : पल्लवी बाळू गायकवाड
३. तृतीय : सुमित्रा राजू पवार
* पुरुष ( खुला गट )
१. प्रथम : गीतेश गणेश चव्हाण
२. द्वितीय : अर्जुन अजिनाथ सोनवणे
३. तृतीय : विघ्नेश छगन नाईकवाडे
* महिला ( खुला गट )
१. प्रथम : कोमल दिलीप राठोड
२. द्वितीय : किर्ती चंद्रकांत गडगची
३. तृतीया : पूजा नर्सिंग तेलंग
रन फॉर संविधान या कार्यक्रमाची सुरुवात राघवेंद्र स्वामी मठ कुणाल आयकॉन रेसिडेन्सी येथून काळुरामशेठ बारणे यांच्या हस्ते हिवरा झेंडा दाखवून प्रारंभ झाला पुढे बारणे कॉर्नर मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा थेरगाव गावठाण येथे सांगता समारंभ झाला. बक्षीस वितरण पूर्वी झुंबा नृत्य सादर करून आरोग्यदायी जीवनासाठी संदेश दिला गेला. त्यानंतर विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला. नरेंद्र माने यांनी भारतीय संविधानाचे महत्व सांगून आमदार शंकरशेठ जगताप उपस्थित संविधानाच्या प्रस्थावनेचे सामूहिक वचन करण्यात आले. त्यानंतर हभप गणेश महाराज फरताळे यांचे विद्यार्थ्यांसाठी संविधान प्रबोधन व्याख्यान झाले. यानंतर आमदार शंकरशेठ जगताप यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून विजेत्यांना बक्षीस वितरण केले. संविधानीमुळे आपण इथे उभे राहू शकतो. बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक प्रयत्न करून सर्वांना समान न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सशक्त असे संविधान २६ नोव्हेंबर रोजी आपल्याला बहाल केले असे मनोगत व्यक्त करून उपस्थितांना आमदार साहेबांनी संविधान दिनाच्या शुभेच्छा देऊन श्री नरेंद्र माने व सौ. रेखाताई माने यांच्या या सामाजिक कार्यात शब्द सुमनानांनी गौरव केला.
आमदार शंकर भाऊ जगताप ,नगरसेवक अभिषेक दादा बारणे, काळूराम शेठ बारणे, तानाजी भाऊ, बारणे, सिद्धेश्वर दादा बारणे, सनी दादा बारणे, रवी दादा भिलारे, नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, नगरसेवक गोपाळराव माळेकर, नगरसेवक संदीप शेठ गाडे, सोनाली ताई संदीप शेठ गाडे, नम्रताई रवी भिलारे, पवना हेल्थ क्लबचे अध्यक्ष नेताजी नकाते, संजय भाऊ पगारे व सर्व हेल्थ क्लबचे सदस्य, तसेच धर्मवीर गार्डनचे अध्यक्ष गोंविंद वलेकर, व्यंकटेश वाघमारे व सर्व सन्माननीय सदस्य, जय मल्हार मित्र मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, स्वराज्य मित्र मंडळाचे अध्यक्ष आकाश पाटील, प्लाम्स सोसायटीचे चेअरमन केशवजी हजारे, प्रकाश शिरगारे, अखिल थेरगाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव कमिटीचे अध्यक्ष विकास गाडे, आकाश ओव्हाळ, दिपक सोनकांबळे, श्रीहरी सोनकांबळे, सर्व समाज बांधव, शिवाजी कदम, गोविंदराव माने, बौद्धाचार्य बबनराव साळुंखे, थेरगाव बहुउद्देश रहिवासी संघाचे अध्यक्ष अक्षय कांबळे व सर्व सन्माननीय सदस्य, नंदाताई काकडे, ज्योती लांडगे, माधुरी हिवाळीताई, प्राध्यापिका मनिषा सुतारताई, सोनालीताई भुसारे, ज्योती शिंदे  पिंपरी चिंचवड माध्यमिक विद्यालय थेरगाव विद्यार्थी प्रिन्सिपल बाळासाहेब राठोड सर, स्पोर्ट शिक्षिका सोनाली मॅडम, न्यू इंग्लिश शाळेचे प्रिन्सिपल विद्या मॅडम, साने गुरुजी शाळेच्या शिक्षिका जाधव मॅडम व सर्व स्टाफ, एम ए विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापिका चट्टे मॅडम, स्पोर्ट शिक्षक विष्णू पाटील सर व सर्व विद्यार्थी आपलक व नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
© All Rights Reserved @Pune Morcha.Website Designed by Swara Infotech | +91 90960 40204